भारतीय संस्कृती संवर्धन शिक्षण प्रसारक मंडळाच्या राजीव गांधी महाविद्यालयाच्या स्थापनेपासूनच ग्रामीण भागातील गरीब, होतकरू,कष्टकरी वर्गातील बांधवाना नजरेसमोर ठेवूनच हे महाविद्यालय आम्ही चालवत आहोत. गेल्या १६ वर्षात महाविद्यालयाची विद्यार्थी संख्या मोठ्या प्रमाणावर वाढलेली असून ग्रामीण ग्रामीण विद्यार्थ्यांना आधुनिक प्रवाहात आणण्याच्या आमच्या उद्देशात आजूनही बदल झालेला नाही.विकासाच्या प्रचंड झोपेचं सोंग घेऊन फोफावणार हे शतक खर तर विक्रम घडवेल.पण मागास व दुर्गम भागापासून हे शतक पर्याय नाही.म्हणून शिक्षणाला माणसाचा तिसरा डोळा म्हटले आहे.

शिक्षण हाच राष्ट्राच्या सामाजिक जडण घडणीतील महत्वाचा दुवा आहे.काल बदलतो आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात यश संपादन करण्यासाठी कठोर परिश्रम करणे आवश्यक आहे.पण शिक्षणाची मूळ विचारधाराच जर जवळ नसेल तर कुठली स्पर्धा आणि कुठले यश? अशी परिस्थिती निर्माण झालेली दिसते.आता मात्र विचार करण्याची वेळ आली आहे. त्यासाठीच जीवनाच्या प्रत्येक अंगाला स्पर्श करीत जनसामान्य आणि भूमिपुत्रांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही विचारपूर्वक पावले उचलून भारतीय संस्कृती संवर्धन शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून राजीव गांधी महाविद्यालय सुरु करून शिक्षणाच्या मूळ प्रवाहापासून दूर गेलेल्या उपेक्षित, शेतकरी वर्ग, कष्टकरी, कामगार वर्गातील मुलामुलीना शिक्षण मिळावे म्हणून शिक्षणाचा मुलभूत पाया बळकट करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

विज्ञान आणि तंत्रज्ञानाच बोट धरून चालणाऱ्या २१ व्या शतकातील वेगवेगळी आव्हाने विद्यार्थ्यांनी पेलली पाहिजेत हे ध्येय समोर ब\ठेवून आम्ही संस्थेची स्थापना केली.त्या दृष्टीने पाऊले उचलली आणि करमाड सारख्या ग्रामीण भागात महाविद्यालयीन शिक्षणाला सुरुवात केली.ग्रामीण भागातील मुलगा किंवा मुलगी शहरापर्यंत जाऊन शिक्षण घेऊ शेकत नाही.त्याना त्यांचे पालक पाठवू शकत नाहीत.पण आपल्याच परिसरात महाविद्यालय असल्याने खर्च, वेळ यांचा समन्वय होऊन बऱ्याच उपेक्षित विद्यार्थ्यांची सोय या महाविद्यालयामुळे भागात आहे. या महाविद्यालयामुळे ग्रामीण संस्कृतीत वाढणारा विद्यार्थी वाढविला, त्याची जोपासना केली.त्याच्या व्यक्तिमत्व विकासाबरोबर त्याला नवा विचार दिला.नव्या विचारातून नवी दिशा,आधुनिकता ही काय असते याची शिकवण देऊन त्याला शहाणे केले.एकंदरीत जणसामान्य व भूमिपुत्रांना न्याय देण्याच्या प्रयत्नातून हे महाविद्यालय नावारूपाला आलेले आहे, यात शंका नाही.

-President
Hon. Advocate Laxmanrao Manal
Rajiv Gandhi College, Karmad